श्रेया बुगडे यांची प्रमुख उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवरात्रौत्सवानिमित्त शेतकरी कामगार पक्ष अलिबाग शहर महिला आघाडी आयोजित महाभोंडला आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागमधील श्रीबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलात हा सोहळा बुधवारी (दि.14) सायंकाळी 4.00 ते 7.00 या वेळेत रंगणार आहे. या कार्यक्रमासह स्पर्धेचे विशेष आकर्षण अभिनेत्री श्रेया बुगडे ठरणार आहे.
हा कार्यक्रम शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून महाभोंडल्याचा हा मोठा कार्यक्रम होणार आहे. तसेच, शब्दावरून उखाणा आणि फुगा फेम अशा विविध स्पर्धा असणार आहेत. या कार्यक्रमात भोंडला उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वीतीय क्रमांकाला 7 हजार रुपये व तृतीय क्रमांकाला 5 हजार रुपये असे बक्षीस दिले जाणार आहे. आकर्षक पारंपारिक वेशभूषा करणाऱ्या प्रथम क्रमांकाला 10 रुपये, द्वीतीय क्रमांकाला 7 हजार रुपये व तृतीय क्रमांकाला 5 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेकाप अलिबाग शहर महिला प्रमुख डॉ. निलम हजारे, सहप्रमुख ॲड. अश्वीनी ठोसर, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले आहे.







