लोणावळ्याहून मोहोपाड्याकडे जाताना अपघात
। खोपोली । प्रतिनिधी ।
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोर घाटात शिंग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या खिंडीत रिक्षाचा अपघात होऊन तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा ही लोणावळा येथून मोहोपाडा येथे जात असताना बोरघाटातील खिंडीत हा अपघात झाला. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून, रिक्षातील तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.







