| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील पिंपळभाट परिसरातील गुरवनगर येथे राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत कृष्णा पाटील (74) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.
मूळचे ते पेझारी येथील रहिवासी होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत रोहन-महाड, आग्राव आणि सागाव-तळवली येथे उपशिक्षक म्हणून आणि थेरोंडा येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा दशक्रिया विधी दि.22 नोव्हेंबर रोजी ओंकारेश्वर मंदिर, दिवलांग येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.






