| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठण्यातील जोगेश्वरी नगर फाटा येथे बुधवारी (दि.25) दुचाकिच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव तुळसा ठमा कोळी (62) असे असून, त्या जोगेश्वरी नगरमधून नागोठणेतील मासळी बाजारात मासळी आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची जोरदार धडक मासळी विक्रेत्या महिलेला बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीचालक किरण सुरवसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







