मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत उद्या (15 डिसेंबर) पासून इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने या संदर्भात माध्यम परिपत्रक काढण्यात आलेले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. मागील वर्षीच्या मार्चपासून हे वर्ग करोना परिस्थितीमुळे बंदच होते. पालिकक्षेत्रातील 1 ली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरु होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी लोकसत्ताला दिली.