। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत महिलांना करिता दुग्धजन्य पदार्थ तयार करणे व ऍडव्हान्स ज्वेलरी मेकिंग या दोन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 50 महिला लाभार्थींनी आपला सहभाग नोंदविला.
या शिबिरास महिला व बालकल्याण समिती सभापती आरती गुरव, सायली धुमाळ, प्रशिक्षक रेश्मा सय्यद, पर्यटन व नियोजन समिती सभापती युगा ठाकुर, नगरसेविका अनुजा दांडेकर, आरोग्य अधिकारी राकेश पाटील, नौनिता कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय स्थापन करून समाजात व औद्योगिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे. यांचा आर्दश घेत महिलांनी आपल्या संसाराला हातभार लावत उज्वल भविष्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः:चा उद्योग व्यवसाय स्थापन करावा, असे आवाहन आरोग्य विभाग अधिकारी राकेश पाटील यांनी केले. तर महिलांना नागरपरिषदेमार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये स्वावलंबी होण्यासाठी मदत करेल, असा विश्वास नैनिता कर्णिक यांनी व्यक्त केला.