नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोल्हारे आदिवासी वाडी आणि तळवडे आदिवासी वाडीमधील दोन तरुण माथेरान येथून नेरळ कडे दुचाकीवरून येत असताना अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना पनवेल येथे उपचारासाठी दाखल केले आहेत.
विनोद रामा वाघे हा आपला मित्र जहिरुद्दीन शेख हे दोघे माथेरान घाटातून नेरळ येथे होते. त्यांची दुचाकी एमएच 46 एए 9992 ही यामाह कंपनीची बाईक नेरळ येथून माथेरानकडे प्रवासी कार एमएच 14-सीएक्स 7485 या गाडीवर जाऊन आदळली.त्यावेळी दुचाकीस्वार जाहिरउद्दीन शेख सोबत दुचाकीवर मागे बसलेला कोल्हारे वाडीमधील तरुण विनोद रामा वाघे हा दुचाकीवरून अलगद उडून कारवर कोसळला.त्यावेळी विनोद वाघेच्या डोक्याला मार लागून जखमी झाला. तर दुचाकीस्वार तरुण शेख यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे.त्या दोन्ही अपघातग्रस्त तरुणांना टॅक्सी चालकांनी आपल्या वाहनांतून नेरळ येथील गुप्ता क्लिनिक मध्ये आणले आणि प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी त्या दोन्ही तरुणांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले आहे.