खोपोली | वार्ताहर |
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर सायमळ दरम्यान पुणे लेनवर टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दि.18 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली, आगीत चालकाची केबीन जळून खाक झाली तर प्रसंगसावधतेमुळे चालकाचा जीव बचावला.
पुणे लेनवरून टेम्पो जात असतानाच इंजिनभधून अचानक आवाज येऊन केबिनला आग लागली.ते पाहून चालकाने प्रसंगसावधता बाळगत उडी मारली. आरबीआय अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून आग विझविली आहे. यादरम्यान काही काळ वाहतूककोंडी झाली होती.देवदूत,अपघातग्रस्तचे सदस्यानांनी परिस्थिती हातळत वाहतूक सुरळीत केली आहे