। अलिबाग । वार्ताहर ।
तळा येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली. तळा येथील परिट आळीमध्ये रोडवर आरोपी रा.परिट आळी याने हजार रुपये किमतीचा अवैध गांजा या मादक व नशाकाराक अंमली पदार्थ अवैधपणे विक्री करण्याकरिता स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत मिळुन आला. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 18 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत तळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्या आला आहे.