। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
प्रचाराचा धुरळा खाली बसून प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊन ठेपल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तिरंगी लढतींमुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. माणगांव नगरपंचायतीमध्ये 13 वॉर्डसाठी 4 पोलीस अधिकारी, 55 पोलीस कर्मचारी, 3 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. माणगाव नगरपंचायत निवडणूकिसाठी 30 उमेदवार रिंगणात असून त्यांच्यासाठी 10,751 मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 5,582 पुरुष व 5,169 महिला मतदार आहेत.
या पार्श्वभूमीवर 59 पोलीस, 3 होमगार्ड, तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.