। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
प्रचाराचा धुरळा खाली बसून प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊन ठेपल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तिरंगी लढतींमुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणूकित 237 उमेदवार मंगळवारी (दि.21) आपले नशीब आजमावणार आहेत. तळा नगरपंचायतीच्या एकूण मतदारांची संख्या 5929 आहे त्यामध्ये 3010 पुरुष आणि 2919 महिला आहेत. दि.१९ रोजी तळा शहरातून पोलिसांनी संचलन केले.यामध्ये तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे,पीएसआय शिवराज खराडे यांसह दंगल नियंत्रण पथक व ५१ पोलीस सहभागी झाले होते.
तळा नगरपंचायतीमध्ये 4 पोलीस अधिकारी, 52 पोलीस कर्मचारी, 11 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. माणगाव नगरपंचायत निवडणूकिसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत.