। पुणे । वृत्तसंस्था ।
कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यावर 28 डिसेंबरपासून पुन्हा पावसाचे सावट आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस, तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतातही अनेक ठिकाणी या काळात पाऊस होणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश भागात पाऊस झाला.