। मुंबई । वृत्तसंस्था ।
आधीच सगळीकडे कोरोनाने थयमान घातला असताना आता ओमायक्रॉनमुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. दिवसागणिक परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. एकीकडे कारोनाचे रूग्ण वाढताहेत तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रूग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या देशातील ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या ही 2135 वर पोहोचली आहे. तर, ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आढळून आले आहेत. 2135 पैकी 828 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून याच्यात महाराष्ट्रातील 653 तर दिल्लीमधील 464 रूग्ण सापडले.