। खारेपाट । वार्ताहर ।
डायरेक्टर व्हॉलीबॉल दुबई ओपन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ पहिल्यादांच विजयी झाला असून दुबईच्या मैदानावर भारत देशाचा तिरंगी फडकला. व्हॉलिबॉल ऑलिंपिक स्पर्धेत चांगल्या प्रकारे यश मिळविण्यासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करू असे मत डायरेक्ट हॉलिबॉल भारतीय संघाचे कोच शरद कदम यांनी मत व्यक्त केले. शरद कदम म्हणाले की, हॉलिबॉल हा खेळ पूर्वीपासून गावोगावी खेळणारा खेळ आहे. या खेळाला ऑलिंपिक स्पर्धेत नेण्याकरिता आम्ही प्रथम जिल्हा संघटना, राज्य संघटना, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डायरेक्ट हॉलिबॉल स्पर्धा अनेक ठिकाणी घेत आहोत. या खेळांचा प्रसार व प्रचार आधिकाधिक व्हावा, हे उद्दिष्ट असून सर्व खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याकरिता डायरेक्ट हॉलिबॉल राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष व्हिपीन चहल, जनरल सेक्रेटरी विक्रम सिंह, कोषाअध्यक्ष शरद कदम, सहसचिव अकुंश पाठक आदी सर्व असोसिएशन पदाधिकारी जातीने लक्ष घालून हा खेळ आँलम्पिक स्पर्धेमध्ये कसा जाईल. यासाठी प्रयत्न करीत आहेत.







