वन विभागाची कारवाई
महाड | प्रतिनिधी |
महाड आणि भोर वन विभागातर्फे शनिवारी रात्री वरंध घाट परिसरात खवल्या मांजराची तस्करी उघडकीस आणण्यात आली.या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
भोर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी वरंधा घाटात गस्त घालत असताना तस्करी करणारे आरोपी महाड परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महाड वनविभागाशी संपर्क साधून संयुक्तपणे आरोपींना पकडण्यात आले.त्यांच्याकडून एक खवल्या मांजर जप्त करण्यात आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 3 दुचाकी मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या.
कारवाईत भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिसाळ,वन परिमंडळ अधिकारी एस. आर. खट्टे, वनरक्षक पी. डी. गुट्टे, वनरक्षक एस. के.होनराव, वनरक्षक थोरात, वनरक्षक देठे, वनरक्षक आडागळे,वनरक्षक के.एम हिमोने तसेच ए. एस. पवार हे सहभागी झालेले होते.