इर्शाद पटवीची शानदार गोलदांजी
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा हरेश्वर मैदानात टेनिस बॉल मर्यादीत षटकांचे रेवदंडा पुरते मर्यादीत संघाचे प्रिमिअर लीगमध्ये साई स्पोर्टस् संघ प्रथम विजेता ठरला. रेवदंडा प्रिमिअर लीग मध्ये दुशांत झावरे संघमालक-साई स्पोर्टस्, ड्रीम लँड संघमालक दिपेश पाटील, गौरव वडके, व ओंकार वडके, साहिर इलेव्हर- संघमालक जोएल उंदीर, यंग स्टार-संघमालक हितेश उंदीर, रेवदंडा रॉयल्स संघ मालक नविद मुकादम, विनायक मानाजी, आराध्य इलेव्हन संघ मालक अनुज कदम, व केतन शेडये या सहा संघाने सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीचे सर्व सामने पाच षटकांचे खेळविण्यात आले.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी दुशांत झावरे संघ मालक असलेले साई स्पोर्ट्स संघाने मिळविला तर व्दितीय क्रमांक अनुज कदम व केतन शेडये मालक असलेल्या आराध्य इलेव्हन संघाने पटकाविला तर नविद मुकामद व विनायक मानाजी संघ मालक असलेला रेवदंडा रॉयल्स संघ व दिपेश पाटील व गौरव वडके व औकार वडके संघ मालक असलेला ड्रीम लँड संघाने सेमीफायनल पर्यंत धडक दिली.
स्पर्धेत कल्पेश नाईक, समीर वर्तक, रितेश राऊत, समिर वर्तक, गौरव वडके, सौरभ शेळके, रोहन भोईर यांनी उत्कृष्ट फलदांजीचे प्रात्यक्षीत दाखवून दिले. तर गोलदांजी मध्ये इर्शाद पटवी यांनी स्पर्धेत शानदार गोलदांजीसह फलदांजी करून रसिक प्रेक्षकांची मने जिकंली तर आकाश गायकर यांनी उत्कृष्ट गोलदांजीचे प्रात्यक्षीत दाखवून दिले. तर अविनाश झावरे यांनी एकाच षटकांत ठोकलेल्या 22 धावा स्मरणीय ठरल्या. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास भव्य चषक व रोख रक्कम वीस हजार रूपये तसेच व्दितीय क्रमांकास भव्य चषक व रोख रक्कम दहा हजार रूपये बक्षिस वितरण कार्यक्रमांत देण्यात आले,तसेच उत्कृष्ट गोलदांज, उत्कृष्ट फलदांज व मालिकावीर यांना चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे आयोजन अॅड रोहित भोईर आणि मित्रमंडळाचे वतीने करण्यात आले होते.