18 वर्षांचा तरुण ठार, 59 जखमी
कोरोना नियमांचं उल्लंघन करत स्पर्धेचे आयोजन
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
तामिळनाडूमध्ये जलीकट्टू स्पर्धेमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपरिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झाली. शुक्रवारी अवनियापुरममध्ये बैलांचा समावेश असणार्या या खेळादरम्यान झालेल्या धावपळीमध्ये एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या 18 वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झाला.
पोंगलच्या दिवशी बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या जल्लीकट्टू या खेळाच्या आयोजनाला सुरुवात केले. पहिल्याच दिवशी या खेळादरम्यान 59 जण जखमी झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही राज्य सरकारने खेळाच्या ठिकाणी बसण्यासाठी 150 जणांची आसन क्षमता आणि उपस्थित 150 जण अशी प्रेक्षक संख्या निश्चित केली आहे.
150 ही आसन क्षमता सामान्य संख्येच्या 50 टक्के इतकी आहे. मात्र, या नियमांचं पालन केले जात असल्याचे चित्र दिसत नाही. अनेक ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असल्याचे चित्र दिसून येत आहे.






