। खोपोली । प्रतिनिधी ।
एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे टँकर जात असताना बोरघाट हद्दीत दत्तवाडी दरम्यान ब्रेक फेल झाल्याने टँकर एक्सप्रेस पुलावरून 50 फूट खाली कोसळला.टँकर रिकामा असल्याने अघटीत घटना घडली.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवार दि.14 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास भरधाव जाणार्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर जुन्या महामार्गावरील बोरघाट हद्दीत ही घटना घडली. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत टँक्करमधील अडकल्यांना बाहेर काढले. त्याना पुढील उपचारासाठी रूग्णालयात हालविण्यात आले आहे.