| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण – खोपोली मार्गावरील सनसिटी इमारतीमधील एसबीआय बँकेच एटीएम चोरट्यांनी फोडल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना रात्री 2 च्या सुमारास घडली. यात सुमारे 50 लाखांच्या रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे बोलले जात आहे. घटना समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. सीसीटिव्ही फुटेज वरून चोरट्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत.