। जकार्ता । वृत्तसंस्था ।
इंडोनेशियाला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉडिटकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार 6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरले. बुधवारी 12 वाजून 55 मिनिटांनी इंडोनेशियातील केपुलावन बरात दया भागात भूकंप झाला. यामुळे त्सुनामी आल्याची कोणतीही नाहिती समोर आलेली नाही. तसेच जिवितहानीसुद्धा झालेली नाही. भूकंपाचे केंद्र 127 किमी खोलवर होते.
गेल्या महिन्यात 19 जानेवारी रोजी इंडोनेशियात 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. भूकंपाचे धक्के अमाहाईच्या 219 किमी पूर्वेला जाणवले होते. गेल्या महिन्यात इंडोनेशियातील प्रमुख बेट जावा इथे मोठा भूकंप आला होता.
यामुळे राजधानी जकार्तामध्ये इमारत हादरली होती. न्यूझीलंडच्या बेटांवर 29 जानेवारीला भूकंपाचे धक्के बसले होते. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली होती. पॅसिफिक महासागरात हा द्विपसमूह येतो.