जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 3 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 314 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 542 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. फेबु्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 161, पनवेल ग्रामीण 34, उरण 1, खालापूर 17, कर्जत 11, पेण 15, अलिबाग 34, मुरुड 2, माणगाव 5, तळा 1, रोहा 9, सुधागड 8, श्रीवर्धन 6, म्हसळा 2 तर महाड 8 असे 314 रुग्ण आढळले. पोलादपूर या तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 12 हजार 616 झाली आहे. यापैकी 2 लाख 4 हजार 770 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 656 वर गेला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 190 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.






