। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील महावीर चौक ते जुनी नगरपालिका दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सदर रस्ता खराब झाल्याने नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. रस्त्याच्या कामामुळे अलिबाग शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना धन्यवाद दिले आहेत.