जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना बुधवारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आलं होतं. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.