। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे असहल असलम कादिरी यांची नगराध्यक्ष, तर सुनील शेडगे यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी जाहीर केले. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला.
आ. अनिकेत तटकरे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मुख्याधिकारी मनोज उकिरडे, राष्ट्रवादी चे प्रदेश चिटणीस अलिशेठ कौचाली, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाजीम हसवारे, मावळत्या नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका जयश्री कापरे, गटनेते संजय कर्णिक, सभापती छाया म्हात्रे, जि.प.चे. कृषी सभापती बबन मनवे, फझल हलदे, नसीर मिठागरे, संतोष सावंत, नईम दळवी, सतीश शिगवण, किरण पालांडे, माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, भाई बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीदरम्यान पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.