अल्पवयीन मुलाला अटक
। हैलाकांडी । वृत्तसंस्था ।
आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. हैलाकांडी येथे एका 15 वर्षीय आरोपीने त्याच्या शेजारी राहणार्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. ही मुलगी 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. पोलीस तिचा शोध घेत होते.
दरम्यान, तिचा मृतदेह 12 फेब्रुवारी रोजी जवळच्या जंगलात सापडला. ही घटना घडवणार्या 15 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलीय. ही घटना हैलाकांडी जिल्ह्यातील सुल्तानीचेरा भागामधील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारीला बेपत्ता होण्यापूर्वी ही मुलगी परिसरातील इतर मुलांसोबत खेळत होती, असं प्राथमिक तपासात समोर आलंय. या मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता, तिचा मृतदेह 12 फेब्रुवारी रोजी जवळच्या जंगल परिसरात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृत्यू होण्यापूर्वी आरोपीने तिला गंभीर जखमी केले होते.मृतदेह शवविच्छेदनासाठी हैलाकांडी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
मुलाचे समर्थन करुन पुरावे नष्ट केल्याबद्दल आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर आसाम राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा डॉ. सुनीता चक्रवर्ती यांच्या सूचनेनुसार, गुवाहाटीतील एक पथक हैलाकांडी इथे पोहोचले असून, या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, एसीपीसीआर आणि पोलिसांनी मिळून या प्रकरणाचा 24 तासांत छडा लावला आहे.