। मुंबई । वृत्तसंस्था ।
प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”