। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोरा ही जिवंत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. सीबीआयने आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे 14 दिवसांचा अवधी मागितला होता. यावर आता इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर सीबीआयने कोर्टाला उत्तर दिले. या प्रकरणाची सुनावणी 3 मार्चला होणार आहे.
तुरुंगातील एका कैद्याने शीनाला काश्मीरमध्ये भेटल्याचे सांगितले होते, असा दावा इंद्राणी मुखर्जीने केला होता. इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला एक पत्र पाठवत शीना बोरा काश्मीरमध्ये वास्तव्य करत असून, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी 3 मार्चला होणार आहे. मात्र, इंद्रायणीच्या खळबळजनक दाव्याने शीना बोरा हत्याकांडात नवीन ट्वी्स्ट येण्याची शक्यता आहे.