जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या 23 नव्या रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने उपचारादरम्यान आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. सात तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 44 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरुवारी पनवेल महापालिका हद्दीत 11, पनवेल ग्रामीण 1, उरण 1, पेण 1, अलिबाग 4, रोहा 2, म्हसळा 1, महाड 1, पोलादपूर 1 असे एकूण 23 रुग्ण आढळले. खालापूर, कर्जत, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन या सात तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 428 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 454 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 692 वर गेला आहे. सद्यस्थितीत 282 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.