। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे शहरात येणार्या अभिषेक शालिग्राम शिरसाट (वय 27) रा. वाशीम वाँर्ड नं. 10, शिरसाट रेसिडेन्सी, दत्ता नगर, लाखाला-वाशिम या तरुण डॉक्टरचा मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर जखमा झाल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी(दि.28) रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास येथील विशाल मेडिकल स्टोअर्स जवळील मिनिडोर स्टँड समोरील रस्त्यावर घडला.
अभिषेक शिरसाट हे आपल्या मोटारसायकलने माहामार्गावरुन नागोठण्यातील हायवेनाका येथून नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौककडे येत होते. मात्र त्यांची मोटारसायकल भरधाव असल्याने येथील वन खात्याच्या पुढे असलेल्या तीव्र वळणाचा त्यांना अंदाज न आल्याने या वळणावर त्यांना आपली मोटारसायकल नियंत्रणात आणता आली नाही. त्यामुळे डॉक्टर शिरसाट यांची मोटारसायकल घसरल्याने ते खाली पडले व यामध्ये त्यांच्या डोक्याला खुपच गंभीर स्वरूपच्या जखमा झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची नोंद नागोठणे पोलिसात करण्यात आली.






