। अलिबाग । वार्ताहर ।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशेअर, रोट्रॅक्टर्स क्लब अलिबाग, आयएमए अलिबाग, लायन्स क्लब अलिबाग, लायन्स क्लब श्रीबाग व पीनएनपी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मुली व महिलांसाठी दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचे सक्षमीकरण-आर्थिक, मानसिक व आरोग्यमय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि.8) संध्याकाळी 4वा. पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे करण्यात आले आहे. सदर चर्चासत्रात डॉ.चंद्रकांत वाजे, डॉ.ओजस्विनी कोतेकर, डॉ.मेघा घाटे, डॉ.पुष्पलता शिंदे, डॉ.राजश्री चांदोरकर, अनघा साडविलकर, आदिती गोखले, डॉ.पुनम नाईक व अॅड.अदिती चांदोरकर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चित्रलेखा पाटील शेकाप जिल्हा महिला आघाडी यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.राजेंद्र चांदोरकर अध्यक्ष, आनंद वालेकर सचिव, निमिष परब खजिनदार, प्रतिक पाटील अध्यक्ष रोटॅ्रक्स क्लब ऑफ सिशोर, डॉ.विनायक पाटील, अध्यक्ष आयएमए, भगवान मालपाणी अध्यक्ष लायन्स क्लब अलिबाग, बाबासाहेब चौगुले अध्यक्ष लायन्स क्लब श्रीबाग यांनी केले आहे.






