। उरण । वार्ताहर ।
जेएनपीटी रस्त्यावर चिर्ले गावाजवळ 40 फूट लांबीचा कंटेनर पलटी झाला. सदर कंटेनर दास्तानफाटा ते गव्हाणफाटा उड्डाण पुलाचे काम चालू असल्याच्या ठिकाणी महामार्गाच्या खाली 50 फूट रस्त्याच्या खाली पलटी झाला. सुदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून सूखरुप बचावला. परंतू सदर अपघात बघता ट्रेलर चालकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 टन सामान भरलेला कंटेनर घेवून ट्रेलर क्रमांक एम एच 46 बीबी 7397 हा जेएनपीटीच्या दिशेने जात होता. परंतू अचानक ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने सदर ट्रेलर हा रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेने 50 फूट खाली घसरला. ज्या जागेवर तो घसरला तिथे उड्डाण पूलाचे कामकाज चालू होते. तर स्त्यावरही वहानांची वर्दळ होती. परंतू सुदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून बचावले व तसेच कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु या रस्त्यावर वारंवार होणार अपघात पाहता अपघात रोखण्याची कोणतीही सुरक्षा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.