• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज! 

Varsha Mehata by Varsha Mehata
March 15, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
नागपुरात निवडणूकिपुर्वीच भाजपाला धक्का; नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जयंत माईणकर

काँग्रेसला आपल्या कार्यशैलीत आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. राहुल आणि प्रियांका गांधी यांचे अनेक निर्णय अंगाशी आल्याचे दिसत आहे. त्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. आपली ताकद क्षिण होत आहे हे ओळखून क्षेत्रीय पक्षांशी स्वतःकडे कमीपणा घेत जमवून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. 

उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपची सत्ता येणं आणि पंजाबसारखं राज्य काँग्रेसने आपने हिसकावून घेणं हे काँग्रेसच्या दृष्टीनं फारच घातक आहे. आणि आता तरी काँग्रेसने योग्य कारवाई न केल्यास काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल ही वस्तुस्थिती आहे. 1996 च्या लोकसभेच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारमधील निवडणुका धरून काँग्रेस सुमारे 50 निवडणूक हरली. जिंकण्याची किंवा डिपॉझिट वाचवण्याची ताकद नसताना काँग्रेसने इंदिरा गांधींची छबी दिसणार्‍या प्रियांका गांधी यांच्या सहाय्याने भारताच्या राजकारणावर अंकुश ठेवणार्‍या या राज्यात काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न केला. 1989 पासून काँग्रेस या राज्यात सत्तेवर नाही. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या संख्या कमी होत गेली आणि आता 403  सदस्यांच्या विधानसभेत केवळ दोन आमदार इतकी नगण्य उरली आहे. काँग्रेसमध्ये स्वबळावर   सत्तेवर येण्याची ताकद देशात आणि एक दोन अपवाद वगळता बहुतेक कुठल्याही राज्यात नाही. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश निवडणुकीत उतरण्याचा अट्टाहास चुकीचा होता. रायबरेली आणि अमेठीसारखे आपले परंपरागत मतदारसंघ राखू न शकणार्‍या काँग्रेसने आपली उरलीसूरली ताकद अखिलेश यादव यांच्या बाजूने उभी करायला पाहिजे होती. ‘लडकी हू लड सकती हू’, हे म्हणण्यापेक्षा आपण देशातील अनेक राज्यात अस्तित्वाहीन आहोत, हे सत्य प्रियांका गांधी  आणि नेहरू गांधी परिवाराने स्वीकारायला पाहिजे. या निवडुकीत राहुल गांधी यांची एकही सभा झाली नाही. मग उमेदवार तरी का उभे करायचे? कारण तसाही समाजवादी आणि काँग्रेस विचारसरणीत फारसा फरक नाही. भाजपच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत होते. कोरोना काळात देशभर पसरलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांचे स्थलांतर, लखीमपुर अपघात यासारख्या अनेक घटना होत्या. पण या सर्वांवर योगी सरकार मात करु शकलं ते केवळ हिंदुत्वाच्या भरवशावर. राम जन्मभूमी आंदोलनापासून भाजपने हिंदुत्व या मुद्द्यांवर आपली पकड घट्ट केली आणि गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदींनी त्यावर स्वतःचा शिक्का उमटवला. त्याच्या च भरवशावर इतर सर्व चुका दबून जातात.
शिखबहुल असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेसने नवज्योेतसिंग सिद्धू सारख्या एकेकाळी सदोष मनुष्यवधाचा आरोप झालेल्या वादग्रस्त व्यक्तीला पंजाब काँग्रेसच अध्यक्षपद देणं ही चूकच म्हणावी लागेल. आणि केवळ चार महिन्यांसाठी चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून पंजाबला दलित चेहरा दिल्याचा दावा करणंसुद्धा काँग्रेसच्या अंगाशी आलेलं दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना दूर करणं ही राहुल प्रियांका यांची चूकच म्हणावी लागेल. ती चुक चांगलीच अंगाशी आली. जनता जेव्हा काँग्रेस आणि भाजपला नाकारते तेव्हा प्रबळ प्रादेशिक पक्षाला जवळ करते हा इतिहास आहे. दिल्लीनंतर पंजाबनी त्याचाच कित्ता गिरवला.
उत्तराखंड हा असा प्रदेश आहे की तिथेही सलग दोन वेळा आतापर्यंत कोणाचेच सरकार आले नाही. या आशेपोटी सत्तापरिवर्तन होईल हे काँग्रेस पक्ष विसंबून होता. पण उलट घडले. काँग्रेसमधील सुंदोपसंदी इथेही चव्हाट्यावर आली. मुख्यमंत्री कोण होईल यावर दोन रावतांच्या मध्ये जुंपली.
गोव्यामध्येही काही वेगळे चित्र नाही. आपल्या आमदारांना सांभाळण्यास काँग्रेस हे असमर्थ ठरले. काही दिवसांपूर्वी  काँग्रेसच्या 15 आमदारांपैकी 12 आमदार हे भाजपात गेले. लोकशाहीत सर्वच पक्षांना कुठेही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पण गोव्यात निवडणूक लढवून तृणमुल काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या भाजपच्या घोषणेला हातभार लावला आहे.
कारण हे सगळे पक्ष काही ना काही प्रमाणात भाजपविरोधी मते घेतात. आणि त्याचा परिणाम अर्थात काँग्रेसची मते कमी होण्यावर होतो. गोव्यात अगदी कमी फरकाने काँग्रेसचे उमेदवार पडले किंवा भाजपचे निवडून आले ते याच कारणामुळे. या मतविभागणीला टाळण्यासाठी भारतीय निवडणूक पद्धतीत बदल करून पक्षाला मिळणारी मतसुद्धा लोकसभा – विधानसभेत प्रतिनिधित्व देण्यासाठी मोजली जाणारी जर्मन सांसदीय पद्धती अंमलात यावी हे आग्रही प्रतिपादन करणारा लेख मी यापूर्वीच लिहिला आहे. पण तशी पद्धत अंमलात येण्याची नितांत गरज आहे. अशा प्रकारची मत विभागणी करून भाजपलाच मदत करणारे एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यासारखे अनेक पक्ष आणि आसदुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे अनेक नेते आहेत.
आसाममधील विजयानंतर भाजपने उत्तर पूर्व भागातील आपला दबदबा वाढवला आणि मणिपूरमध्येही आपला वरचष्मा कायम ठेवला.
एकंदरीतच 5 राज्यांमध्ये निवडुका झाल्या होत्या. त्या पाचही निवडणुकीत काँग्रेस  पक्ष अगदी सपाटून तोंडावर आपटला आहे. लोकशाहीमध्ये चांगला विरोधक असणं असं हे लोकशाहीच्या हिताचे असते. पण लागोपाठ दोन वेळा काँग्रेस स्वत:कडे विरोधी पक्षनेते पद सुद्धा राखू शकला नाही.
काँग्रेसला आपल्या कार्यशैलीत आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. राहुल आणि प्रियांका गांधी यांचे अनेक निर्णय अंगाशी आल्याचे दिसत आहे. त्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. आपली ताकद क्षिण होत आहे हे ओळखून क्षेत्रीय पक्षांशी स्वतःकडे कमीपणा घेत जमवून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
येणार्‍या दिड वर्षात 5 विधानसभेच्या निवडणुका आहेत. यात गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यासारख्या तीन भाजप शासित आणि दोन काँग्रेस शासित राज्यांचा समावेश आहे.
त्याची तयारी आतापासूनच सुरु करावी लागेल. राजस्थान मध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातून विस्तवही जात नाही. असाच काहीसा प्रकार छत्तीसगढ येथे ही आहे. या दोन्ही राज्यातील भांडणे लगेच सोडवणे आवश्यक आहे. गेहलोताना बदलायचे असल्यास आत्ताच बदलणे  योग्य राहील. निवडणुकीसाठी केवळ दोन चार महिने उरले असताना बदलणे मूर्खपणा ठरेल. छत्तीसगडमध्ये आरोग्यमंत्री टी एस सिंगदेव हे असंतुष्ट नेते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं याची वाट पाहत आहे. सचिन पायलट आणि सिंगदेव यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तेही ज्योतीरादित्य सिंधीया यांचा मार्ग चोखाळू शकतात. ती शक्यता लक्षात घेऊन वेळेवर कार्यवाही केली पाहिजे. देशातल्या सर्वच निवडणुकांसाठी भाजप विरुद्ध एकास एक लढत द्यावी लागेल. त्यासाठी काँग्रेसला जवळपास सर्वच राज्यात प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावे लागेल आणि हे करताना स्वतःकडे कमीपणा घ्यावा लागेल. हे प्रयत्न लगेच सुरु केले तर 2024 ला त्याचे फायदे दिसतील.आणि कदाचित मोदींना तिसर्‍या टर्मपासून रोखण्यासाठी एक तगड आव्हान उभ करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिग्विजय सिंग काय महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासारख्या बोलघेवड्या नेत्यांना आपले तोंड गप्प ठेवण्यासंबधी सांगावेच लागेल. असं न केल्यास भाजपला अभिप्रेत काँग्रेस विहीन भारत काँग्रेस नेतृत्वाच्या चुकीमुळे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. देशासाठी काँग्रेस बोध घेईल ही अपेक्षा! तूर्तास इतकेच!

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

निर्णायक निकाल

Next Post

सिंधुदुर्गातील आठही पं.स.वर प्रशासक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
alibag

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
Next Post

सिंधुदुर्गातील आठही पं.स.वर प्रशासक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?