कार्यकर्त्यांची माफी मागण्याची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
7 एप्रिल रोजी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी यासाठी शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले. त्यावेळी कर्जतचे आ. शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. आ.महेंद्र थोरवे यांच्या या वक्तव्याचा निषेध भाजपच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, तुम्ही केवळ शिवसेनेचे नाही तर भाजप-सेना युतीचे आमदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि कर्जतची शांतता बिघडवू नये, असा इशारा आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा निषेध करून दिला. आमदारांनी आपल्या वक्तव्याबद्दल भाजपची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात यावी.
शिवसेनेच्या आमदारांच्या या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेरळ येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आमदारांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला. भाजपच्या तालुका कार्यकारिणी नंतर आयोजित केलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर,कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, ऋषिकेश जोशी, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ तसेच मंदार मेहेंदळे, प्रमोद पाटील, विनायक पवार,आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.







