। अलिबाग । प्रतिनिधी ।
सोशल मिडियावर सध्या महागाईवरुन केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले जात आहेत. सर्वसामान्यांनाच नाही तर प्रत्येकाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपला संताप सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे. आज ट्विटरवर नरेंद्र कुमार फिरोदिया यांनी ट्विट करुन 1963 सालातील पेट्रालच्या दराची पावती प्रसिद्ध केली आहे. त्यावेळी 3 रुपये 60 पैसे प्रति लिटर दर असल्याचे दिसून येते. तसेच त्याद्वारे पेट्रालचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब मोदी भक्तांना चांगलीच झोंबली असल्याचे या ट्विटवरुन स्पष्ट झाले आहे.