। कर्जत । वार्ताहर ।
कर्जतमध्ये सुरेशभाऊ लाड चषक भव्य ओव्हर आर्म नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धा 18 व 19 एप्रिल रोजी खेळल्या जाणार आहेत. ग्रीन व्ह्यू हॉटेलच्या मागे भिसेगाव मैदानावर नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी केले आहे. दोन दिवस चालणार्या या स्पर्धेचे उद्घाटन दि. 18 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष भगवान चंचे, नगरसेवक शरद लाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अतुल चंचे, सीताराम लदगे, रमेश लदगे, नथुराम लदगे, स्वप्नील जाधव, भिसेगावचे पोलीस पाटील संजय हजारे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकास एक लाख, दुसरा क्रमांक 75 हजार, तिसरा क्रमांक 50 हजार, चौथा क्रमांक 35 हजार, पाचवा क्रमांक25 हजार, सहावा क्रमांक25 हजार व आकर्षक चषक तसेच मालिकवीरसाठी सायकल, उत्कृष्ट फलंदाज कुलर, उत्कृष्ट गोलंदाज कुलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आणि सामनावीर आकर्षक चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी साईनाथ बोराडे, संदीप बोराडे, सलमान शेख, आकाश लाड, सिद्धेश खराडे, गणेश गोसावी मेहनत घेत आहेत.