। अलिबाग । प्रतिनिधी ।
थोर संतश्रेष्ठ सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत सांप्रदायाचा रायगड जिल्ह्यात प्रचार करणारे गुरूवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांची 40 वी पुण्यतिथी मंगळवारी (दि.19) रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील श्रीदत्त मंदिर सभागृह पेझारी येथे साजरी झाली. याप्रसंगी आयोजित भव्यदिव्य सन्मान सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजसेविका जिविता पाटील कुसुंबळे यांना जिल्हा परिषद सदस्या, महिला बालकल्याण कमिटी सदस्या तसेच झेप फाऊंडेशन अध्यक्षा चित्राताई आस्वाद पाटील यांच्या शुभहस्ते गुरूवर्य सुभानराव राणे पुरस्कार प्रदान करून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
यावेळी श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान पेझारी अध्यक्ष दिगंबर सुभानराव राणे, खासदार अरविंद सावंत, रा.रा. रघुजीराजे आंग्रे, परमपूज्य रंजन पंतबाळेकुंद्री, प.पू. अभिजित पंतबाळेकुंद्री, भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, पंडित अरुणबुवा कारेकर, शंकर राव म्हात्रे, दीप्ती राणे, ऋचा जुईकर, आदित्य कडू इ. मान्यवर उपस्थित होते.
जिविता पाटील यांनी वयाच्या अडचणींवर मात करीत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांचा भास आभास हा चारोळी संग्रह, काव्यकुंज हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच ती चे अस्तित्व हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. समाजकार्याची विशेष आवड जोपासत असताना तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन ची स्थापना केली. अनेक मुलींना खास करून आदिवासी मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले व मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. मजीवाची पर्वा न करता गरजवंतांना तसेच कोरोनाग्रस्तांना सेवा पुरविण्याचे इतकेच नव्हे तर 54 कोरोना ग्रस्त लोकांना स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना वेळप्रसंगी स्वत:चे दागिने गहाण टाकून मोफत जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम जिवीता पाटील यांनी केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत दिगंबर राणे यांच्या श्रीपंत भक्त मंडळ पेझारी यांनी त्यांना मानाचा समजला जाणारा गुरुवर्य सुभानराव राणे पुरस्कार देऊन सन्मानित के







