उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण
। म्हसळा । वार्ताहर ।
जिल्ह्यांतील काही भागांत आचानक पडलेला पाऊस, सध्या हवामानांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे असह्य असा उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेच्या लाटा एकामागून येत असून आतापर्यंत कधी नव्हे एवढा उकाडा यावर्षी राज्यांत आणि म्हसळा तालुक्यात जाणवत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.मुंबई ठाण्यासह राज्यातील अन्य शहरी भागातील पारा अचानक उसळी मारत असल्याचे समजत आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे तालुक्यांतील आंबा- काजू बागायतदारही चिंताग्रस्त झाले आहेत.गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे उष्णतेच्या तीव्र लाटा उत्तरेकडून दक्षिणेकडे सातत्याने कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात देखील उष्णतेच्या लाटा सातत्याने आल्या. heat wave मुंबई सोबतच कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील एकापाठोपाठ उष्णतेच्या लाटांची स्थिती आली. एप्रिल महिन्याची सुरूवातच आठ दहा वर्षात नव्हे एवढ्या उच्चांकी तापमानाची या वर्षी नोंद राहीली. या उष्णता लाटेमुळे सगळ्यांना हैराण केले आहे. लोक अधिक आजारी पडत आहेत. अशक्तपणा, डोकेदुखी, सर्दी,मळमळ अशा समस्या यामुळे उदभव आहेत.
दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये. जास्तीतजास्त पाणी प्यावे, अगदी तहान लागलेली नसेल तरी. प्रवासातही पाणी सोबत ठेवावे. हलक्या रंगाचे आणि थोडे सैलसर कपडे घालून वावरावे. टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडल्यास उत्तम. -डॉ. महेश मेहता, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, म्हसळा







