। उरण । वार्ताहर ।
उन्हाळा आला की, लिंबू-पाणी, कोकम सरबतबरोबर आरोग्याला फायदेशीर असणार्या शहाळ्याला मागणी वाढत असते. यंदा मागणी असली, तरी शहाळ्याच्या दरात प्रचंड बाढ झाली आहे. मोठे शहाळे 50 तर छोटे शहाळे हे 40 रुपयाने विकले जात आहे. वाहतुकीचा वाढता खर्च आणि वाढत्या उष्णतेमुळे दरात वाढ झाल्याचे विक्रेता नसीर खान यांनी सांगितले. उरण शहरात आनंद नगर, उरण चारफाटा, विमला तलाव, महात्मा गांधी पुतळ्या समोर, पिरवाडी वाडी, सिडको चारफाटा, उरण पंचायत समिती समोर आदी ठिकाणी शहाळे विकणार्यांच्या गाड्या आहेत.
दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने तहान भागविण्यासाठी सर्वसामान्यांच्या आवडीचे पेय असल्याने शहाळ्याला मागणी अधिक असते. याने पोट भरते आणि शहाळ्याच्या दरांत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्यावर्षी हेच शहाळे 40 ते 30 रुपयांना मिळत होते. आता प्रत्येक शहाळ्यामागे दहा रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे ज्यांच्या खिशाला परवडते तेच ग्राहक यंदा शहाळे खरेदी करत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. शहाळे हे केरळ आणि मद्रास येथून येतात. एका ट्रकमधून सात ते आठ हजार शहाळे येतात. पेट्रोल व डिझेलच्या दारात वाढ होण्या आधी 25 हजार वाहतुकीचा खर्च होता आता 40 हजारावर गेला आहे .त्यामुळे हि दर वाढ झाली आहे तसेच उन्हामुळे शहाळ्याना मागणी देखील असते.
भरपूर फायदे
शहाळ्याचे फायदे भरपूर आहेत तयार रोज शहाळ्याचे पाणी प्यायल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.रोगप्रतिकारक क्षमता वाढते, वजन कमी करण्यास मदत होते. प्रोटीन, खनिज आणि कॅल्शियम यामध्ये भरपूर असते. दिवसभर भूक लागत नाही, त्वचा निरोगी राहते, डिहायड्रेशनपासून वाचण्यास मदत होते.