। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगर पालिकेचे कामोठ्यातील स्वीकृत नगरसेवक शेकापचे शंकर म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतुन सेक्टर 5 कामोठे येथील मैदानात ओपन जिम चे 1 मे रोजी उदघाटन शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक गणेश कडू, पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, नगरसेवक सखाराम पाटील, जेष्ठ नागरिक अध्यक्ष हरिसचंद्र पाटील, कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे,गौरव पोरवाल, सुरेश खरात, मधुकर सुरते,अल्पेश माने, काशिनाथ जाधव,ज्योती म्हात्रे,गिता उंडे,अरुणा बांगर,शुभांगी कड आदी मान्यवर उपस्थित होते. कामोठे शहरांत मुंबई आणि उपनगरातून बरेचसे नागरिक राहण्यासाठी आले आहेत, त्यांची शाररिक दृष्टया फिट राहण्यासाठी त्याना व्यायाम शाळेची गरज लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर म्हात्रे यांनी त्यांच्यासाठी आपल्या नगरसेवक निधीतून हि ओपन जिम सुरु केली असून त्याचा फायदा येथील नागरिक आनंदाने घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला