| महाड | प्रतिनिधी |
महाड शहर आणि परिसरातील पूरप्रश्न निकाली काढण्यासाठी नदी पात्रांतील गाळ आणि जुठे काढणे गरजेचे झाले आहे. सीआरझेडमुळे या कामामध्ये अडथळे येत आहेत. पूरनियंत्रणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सीआरझेड नियम शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी 9 मे रोजी मुंबईत बैठक घेण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. याबाबतचे निवेदन आ भरत. गोगावले यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना दिले.
नदीपात्रातील गाळ काढल्यास आणि जुठे मोकळे केल्यास महाड शहराला असलेला पुराचा धोका बर्याच अंशी कमी होणार आहे. सावित्री नदी आणि तिच्या उपनद्यांमधील सीआरझेड क्षेत्राबाहेरील पात्रातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ देखील झालेला आहे. मात्र जे पात्र सीआरझेड क्षेत्रात येते ते थो हे काम करण्यास परवानगी नसल्याने अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
हीच बाब आ.भरतशेठ गोगावले यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत स्वतःचे एक आणि महाड पूर निवारण समितीचे एक अशी दोन निवेदने आ. गोगावले यांनी ठाकरे दिली.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने एक बैठक घेण्याची विनंतीही आ. गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांना केली. या मागणीला आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शक्य झाल्यास यावर निर्णय घेण्यासाठी 9 मे रोजी बैठक घेण्याचा शब्द त्यांनी आ. गोगावले यांना दिला आहे.