| अलिबाग | वार्ताहर |
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा चोविसावा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार, दि.11 मे रोजी सकाळी 11 वाजता महामहीम राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा.डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन, खनिकर्म, उद्योग राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री अदिती तटकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.