। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
संप मिटल्यानंतर मुरूड जंजिरा आगारातील बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून आगारातील सर्व 180 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती मुरूड आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे, यांनी दिली.
आगरातून दररोज 34 फेर्या सुरू करण्यात आल्या असून हंगामी तत्वावर थेट नालासोपारा ते मुरूड अशी बससेवा देखील सुरू करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे औरंगाबाद फेरी सुरू कऱण्यात आली आहे. मुंबईकडे 7 तर पुण्याकडे 3 फेर्या, कल्याण 2, ठाणे 2, बोरिवली 5, नालासोपारा 1, रोहा 2, बोरिवली जादा 1 सकाळी 9 वाजता, बोरिवली परत सायंकाळी 4 वाजता, मुरूड ते नालासोपारा दुपारी 12:45 वाजता, परत 5 वाजता बहुसंख्य बसेस अलिबाग मार्गे आहेत. मुरूड ते मुंबई 4:45,6:30, 8:30,10, 13,15:30,17:30,23 , मुरूड रोहा मुंबई-सकाळी 6:30 आणि दुपारी 15 वाजता, मुंबईतून सायंकाळी 6 वाजता, अलिबाग मार्गे मुरूड बस असून रात्री 12 मुंबई अलिबाग मार्गे आणि दुसरी बस रोहा भालगाव मार्गे मुरूड कडे येईल. मुरूड ते मुंबई सकाळी 6,7:45,9, 10:45,11:45,13, 14, 18 वाजता, मुरूड ते मुंबई ही रातराणी सेवा सुरू आहे. मुरूड- पुणे सकाळी 7, दुपारी 2:45, सायंकाळी 4, पुणे ते मुरूड सकाळी 7:30, 8:30, दुपारी 1:45 अशा वेळा असून सर्व बसेस स्वारगेट ला जातील आणि तेथूनच सुटतील. मुरूड तेऔरंगाबाद बस सकाळी 9 वाजता तर औरंगाबादहून सकाळी 10 वाजता सुटेल ही बस जात येता औरंगाबाद-शिवाजीनगर पुणे मार्गे येईल. आधिक माहितीसाठी सहा.वाहतूक निरीक्षक श्री भोसले मोबाईल- 9834113255, वाहतूक नियंत्रक संजय पेणकर मोबाईल 8446988768, श्री भालेराव मोबाईल9420835931 वर संपर्क करावा.