। खेड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र भूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्यातर्फे खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांकडून 18 मे रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तदान करणार्या श्री सदस्यांनी रक्तदानापूर्वी पात्रता आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शंभराव्या जन्मशताब्दीनिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, खेड , दापोली, चिपळूण, गुहागर, पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांकडून 18 मे रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.