| पनवेल | वार्ताहर |
पनवेलकडून पेणच्या दिशेने जाणारे आष्टी लॉजिस्टिकसमोर रेल्वे रुळावर एका 40 ते 45 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडून आलेला आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. पनवेल ते पेण रेल्वे रूळावर 74/34 किलोमीटर येथे ट्रेनचा जोराचा धक्का लागल्याने 40 ते 45 वर्षीय इसमचा मृत्यू झाला. या इसमाच्या हाताच्या मनगटावर आतल्या बाजूने दिल गोंदलेला आहे. तसेच छातीवर डाव्या बाजूस इंग्रजीत एकनाथ व मा आणि छातीवर उजव्या बाजूस इंग्रजीत मुरारी व मा असे गोंदलेले दिसत आहे. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा फाटलेला शर्ट आहे. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री पवार यांच्याशी संपर्क साधावा.