। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागच्या सभागृहात गुरुवार दि. १९ अलिबागेतील ब्रह्मा विष्णू महेश मल्टिप्लेक्सचे मालक, ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागचे ज्येष्ठ संचालक गजेंद्र दळी यांचा ८८ वा वाढदिवस संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल राऊत, सचिव यशवंत थळे, डी.डी. नाईक, बळवंत वालेकर, राजा बने, विलास डोळस, आर.के. घरत, मनोहर सुर्वे, अनंत देवघरकर, सुभाष क्षिरे, द्वारकानाथ नाईक, सखाराम पवार, शरद कोरडे, उमाजी केळुसकर, नागेश कुलकर्णी, चारुशीला कोरडे, हेमकांत सोनार, संजय काबळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष लं.नी. नातू यांच्या हस्ते गजेंद्र दळी यांचे त्यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतनपर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रफुल्ल राऊत, द्वारकानाथ नाईक, सखाराम पवार, उमाजी केळुसकर, नागेश कुलकर्णी आदींची अलिबागच्या जडणघडणीतल्या त्यांच्या सहभागाबद्दल अभीष्टचिंतनपर भाषणे झाली. अखेरीस आपल्या सत्काराला गजेंद्र दळी यांनी उत्तर दिले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.






