साडे दहा लाखांचा ऐवज लंपास
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून,या चोरांचा आळा घाला,अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रिळे गावातील रवींद्र गजानन म्हात्रे यांच्या घरातून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम 90 हजार रुपये असा एकूण 10 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी संशयितावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित इसमाने म्हात्रे राहत्या घरातील कपाटात ठेवलेले 90 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक सोन्याचे गळ्यातील गंथन,एक चेन,गळ्यातील गंथन, दोन अंगठ्या, नेकलेस, सोन्याचे गळ्यातील पान असा एकूण 10 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.