। पेण । वार्ताहार ।
पेण तालुक्यातील तरूण पत्रकार विनायक पाटील यांनी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या तयारीचा बिगूल वाजवला आहे. दादर गावचे मुळचे रहिवासी असणारे विनायक गेली 16 वर्ष रामवाडी येथे वास्तव्याला आहेत. समर्थ नगर मधील नागरी सुविधांबाबत वेळोवेळी आपले परखड मत मांडणार्या विनायक पाटलांना राजकारणी मंडळीकडून दरवेळेला द्वेशाला सामोरे जावे लागते. अखेर मित्र परिवारांनी विनायक पाटलांना सल्ला दिला अजून किती वर्ष इतरांचे झेंडे खादयांवर घेउन नाचशील. आता वेळ आली आहे स्वतः लढण्याची. गेल्या नगरपालिकेच्या तीन निवडणूकीमध्ये विनायक पाटली यांनी आपली राजकीय ताकद इतरांसाठी वापरली. परंतु आता ही ताकद इतरांसाठी न वापरता स्वतः साठी वापरण्याचे ठरविले असून वेळोवेळी आरोग्य शिबीर, कोरोना काळात मदतीसाठी धडपड, समर्थ नगरमध्ये नागरी सुविधा मिळाव्या म्हणून होत असणार्या सरकारी कार्यालयामध्ये धडपड या सर्व बाबींचा विचार करता त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जमलेले समर्थक पाहता पाटील हे यंदा रामवाडीमध्ये निश्चितच काही तरी बदल घडवणार असाच राजकिय विष्लेशकांचा मत आहे.