। पेण । वार्ताहर ।
पेण शहरात बारा ठिकाणी रिक्षांना थांबा दिला असून या ठिकाणी जवळपास 800 ते 1000 युवक आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह रिक्षा चालवून करत आहेत. मात्र ज्या ठिकाणी हे युवक आपल्या रिक्षा थांबवतात त्यातील एक ही रिक्षा थांबा अधिकृत नाही.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथुन माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वय पेण शहरातील अधिकृत रिक्षा थांबा किती आहेत या विषयी माहिती मागितली असता एक भयान सत्य समोर आले ते म्हणजे पेणमध्ये एकही रिक्षा थांबा अधिकृत नाहीत. पेण शहरात पेण एसटी स्टॅड, पेण नगरपालिका, कोळीवाडा नाका पेण, देवआळी, पेण पोलिस ठाणे, प्रभूआळी, चावडी नाका, शंकर नगर, तेरा घरांची आळी, रायगड बाजार, रामवाडी, म्हाडीक वाडी या ठिकाणी रिक्षा थांबा आहेत. पेण एसटी स्टॅड व पेण नगरपालिका शेजारी वगळता इतर ठिकाणी रिक्षा या रस्त्यावरच थांबत आहेत. त्यासाठी स्वतंत्र अशी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे नजिकच्या काळात ही व्यवस्था न झाल्यास रिक्षा चालकांना आपला धंदा करणे जिक्रीच होऊ शकते. तरी वेळेस रिक्षा चालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा विक्रम मिनीडोअर चालकांप्रमाणे प्रशासनाविरूद्ध संघर्षास उतरावे लागेल.
शहर ज्याप्रमाणे वाढत आहे, त्याप्रमाणे रिक्षा थांब्याची तरतुद करणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी नगरपालिकेने प्रस्ताव तयार करून आमच्याकडे पाठवणे गरजेचे आहे. मग पोलीस, नगरपालिका प्रशासन, आणि आर.टी.ओ एकत्रितरित्या संयुक्त पाहणी दौरा करून अधिकृत थांब्याची तरतुद करू. मात्र नगरपालिकेने आम्हाला तसा प्रस्ताव पाठवावा.
महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी