। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवारी दुसरी ऑनलाईन जाहिर करण्यात आला. या परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल 96.94 टक्के लागला असून, मुंबई विभागात उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 97.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ठाणे 97.13, पालघर 97.17, मुंबई (जनरल) 96.30, मुंबई (सब.1) 96.72, मुंबई (सब.2) 96.64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 195 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 34 हजार 991 विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील 34 हजार 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 824 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.35 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 99.02 टक्के म्हसळा तालुक्याचा असून, सर्वात कमी 94.43 टक्के निकाल मुरुड तालुक्याचा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2.38 टक्क्यांनी दहावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 99.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर चालू वर्षात 97.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत टक्का घसरला
रायगड जिल्ह्यातील 97.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत 2.38 टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.12 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.65 टक्के इतके आहे. तसेच मुंबई विभागात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. मुंबई विभागात एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.11 हजार 527 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणीरायगड जिल्ह्यातील 34 हजार 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये 11 हजार 527 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 14 हजार 725 विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, तर 6 हजार 889 विद्यार्थी व्दितीय श्रेणी, 1 हजार 126 विद्यार्थी पास श्रेणीणे उत्तीर्ण झाले आहेत.84.85 टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्णरायगड जिल्ह्यातील 1 हजार 797 पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील 1 हजार 723 विद्यार्थी परिक्षेला सामेरे गेले. त्यापैकी 1 हजार 462 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 261 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 84.85 टक्के इतके आहे.तालुकानिहाय दहावी निकालतालुका – टक्केपनवेल – 97.61उरण – 97.35कर्जत – 95.78खालापूर – 95.40सुधागड – 97.39पेण – 97.64अलिबाग – 98.69मुरुड – 94.43रोहा – 97.41माणगाव – 97.36तळा – 97.59श्रीवर्धन – 98.11म्हसळा – 99.02महाड – 98.60पोलादपूर – 97.10