उरण । वार्ताहर ।
एकविरा आईच्या दर्शनासाठी रोज हजारोंच्यां संख्येने भाविक आणि पर्यटक येत असतात. जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात आपल्या अनमोल योगदानातुन अनेक सामाजिक उपक्रम राबवून विविध समाजहितांची कार्य साकारणार्या दोन संस्था अर्थात जे.एम.म्हात्रे.चॅरिटेबल संस्था पनवेल आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी (उरण)या दोन सामाजिक संस्थांनी आपल्या माध्यमातून आणि मित्र परिवाच्या वतीने आई एकविरा मातेच्या कार्ला डोंगर माथ्यावर एक आदर्शवत अभियान राबविण्यात आले ते म्हणजे कार्ला डोंगर स्वच्छता अभियान.
या अभियान अंतर्गत जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल सामाजिक संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वीचे राजू मुंबईकर यांनी आपल्या माध्यमातून आपल्या मित्र परिवाराला सामजिक बांधीलकीच्या भावनेतून श्रमदानाकरिता आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला साथ देत श्रमदानातुन श्री आई एकविरा मातेचा कार्ला डोंगर परिसर स्वच्छ करण्यात आला. लोणावळा, वेहेरगाव येथील आई एकविरा मातेच्या मंदिर परिसराच्या आजूबाजूला आणि मंदिर वाटेवरील पायर्यांवर पडलेल्या प्लस्टिक बाटल्या आणि कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.